क्रांतिवीर स्व.रामचंद्र सखाराम पवार - मामासाहेब

Founder
Introduction

Our History

        सन १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यावेळी ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी स्वच्छेने भाग घेतलेला होता.त्यामध्ये स्वार्थाची कोणतीच भावना नव्हती.राष्ट्रप्रेम,स्वातंत्र्यप्रेम ,समाजहित हेच विचार अशा तरुणांच्या मनात होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कॉंग्रेस पक्षाच्या काही मोजक्या लोकांना सत्तेच्या राजकारणात कार्यकर्तुत्वाची संधी मिळाली.परंतु ज्यांच्याजवळ मोठी कार्यशक्ती होती तिला वाव मिळत नव्हता.अशा कार्यकर्त्यांना सहकारी चळवळीने स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे व राजकारणपेक्षा समाजजीवनाला  अधिक उपकारक ठरणारे एक मोठे कार्यक्षेत्र निर्माण करून दिले.अशा कार्यामध्ये क्रांतिवीर श्री.रामचंद्र सखाराम पवार उर्फ मामासाहेब यांचा प्रकर्षाने उल्लेख केला जातो.

          मामासाहेब म्हणजे एक समजूतदार,विश्वासू,निस्वार्थी नेतृत्व.अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या,मर्यादित शिक्षण असलेल्या अशा मामांनी सुरूवातीला किर्लोस्कर कारखान्यात कामगार म्हणून कामास सुरुवात केली.प्रामाणिकपणे भरपूर काम करणे ही त्यांची श्रद्धा आहे.आदरणीय श्री.शतंनुरावजी किर्लोस्कर उर्फ दादासाहेब यांच्या सोबत काम करत असताना त्यांनी त्याच्यामधील एक उत्कृष्ट उद्योजक दाखवून दिला.प्रत्येक कामामध्ये त्यांची सचोटी,गुणवत्ता,कठोर परिश्रम आणि ध्येयनिष्ठा ही त्यांची चतु:सूत्री होती.शेतीच्या पारंपारिक तसेच आधुनिक शेतीच्या पद्धतींचा वापर करून त्यांनी एका प्रगतशील शेतकर्‍याचे दर्शन घडवून दिले.आपल्या बरोबरच भागातील शेतकर्‍यांना शेतीबाबत मार्गदर्शन करीत,शेतीच्या पद्धतींचे ज्ञान आणि शैली सर्वांना अवगत करून दिली.गरजू शेतकर्‍यांना आवश्यक गोष्टींचा पुरवठा करून मदत केली.फक्त शेतीच नाही तर त्यांच्या मधील व्यावसायिक गुणांचा अवलंब करीत त्यांनी सामान्य लोकांच्या हाताला काम मिळावे या हेतूने सहकारी गिरणी,सहकारी खंडसरी आणि ऑइल मिल अश्या विविध व्यवसायांची उभारणी केली.तसेच असा उद्योग करू इच्छिणार्‍या लघु उद्योजकांना मदतीचा हात देत प्रोत्साहित केले.त्यांना खंबीर आधार देऊन त्यांच्या प्रगतिची मुहुर्तमेढ रोवली.

          कामाच्या सर्व व्यापातून सुद्धा त्यांनी आपले छंद जोपासले.मित्र-मंडळीसोबत सल्ला-मसलत करणे,गप्पा रंगवणे,त्यांच्या सोबत आवडीने भजी खाणे इत्यादी गोष्टींची त्यांना आवड होती.आपल्या प्रगल्भ विचारांनी लोकांनमध्ये एक नवीन उमेद निर्माण करून ते त्यांच्या मनावर एक छबी उमटवत असत.आपल्याकडे आलेल्या लांबच्या असो वा जवळच्या,श्रीमंत असो वा गरीब,ते प्रत्येकाची तेवढीच आपुलकीने चौकशी करत.जिव्हाळ्याने त्यांचा पाहुणचार करीत.मामासाहेबांच्या या छंदांच्या सोबतच त्यांना आदध्यात्माची सुद्धा खूप आवड होती.भजन-किर्तन करून हरी नामात दंगून जाणे त्यांना खूपच प्रिय होते.त्यांच्या या हरीप्रियतेतूनच त्यांनी सत्यविजय भजनी मंडळाची स्थापना केली.या भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये अद्ध्यात्माबद्दल ओढ निर्माण केली.आज देखील हे भजनी मंडळ मामांच्या विचारांची पालखी आपल्या खांद्यावरती वाहत आहे.लोकांना सद्विचारांची शिकवण देत आहे.    

 

१९४२ च्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.त्यांच्या सारख्याच अनेक स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी संकटाच्या काळात मदत केली.या चळवळींनंतर त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.सक्रिय राजकारणामधे ते कुठेही सहभागी झाले नाहीत. मंदीच्या काळामध्ये त्यांनी कामगारकपातविरोधी लाक्षणिक संप घडवून आणला.एवढच काय,पण कारखानासमिती स्थापन करून त्यामध्ये ते  स्वत: कामगार प्रतिंनिधी म्हणून निवडून गेले.सर्वात महत्वाचे म्हणजे राजकीय चळवळीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या आर्थिक लाभ घेण्याच्या मोहापासून ते पूर्ण अलिप्त राहिले.सध्याच्या सत्तास्पर्धेबद्दल,भोगाच्या राजकारणाबद्दल,वशिलेबाजीबद्दल त्यांना तिटकारा आणि राग होता.सध्याच्या कॉंग्रेस संस्कृतीबद्दलही ते नाराज होते.असे असले तरी त्यांच्यातील कार्यशक्ती त्यांनास्वस्थ,स्वकेंद्रित जीवन जगू देत न्हवती.

         समाजहिताच्या तळमळीतून सन १९६४ मध्ये त्यांनी श्री.सत्यविजय सहकारी बँक लि.कुंडल ही संस्था स्थापन केली व ती अत्यंत कार्यक्षमतेने,निरलसपणे चालवली.बँकिंगचे क्षेत्र हे विश्वासाच्या पायावर उभे राहते.बँकेचे व्यवस्थापण सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी ठेवीदारांचा पैसा गरजूंच्या उत्पादक आर्थिक प्रकल्पासाठी जेव्हा शास्त्रीय निकषावर वापरते असा विश्वास सभासद व ठेवीदारांच्या मनात निर्माण होतो तेव्हाच अशा प्रकारची सहकारी बँक प्रगती करू शकते.

Just Some Facts

Facts For Choosing Us

100 k
Happy Clients
250 +
Projects Done
60 +
Expert People
250 +
Portfolios
Experienced People

Our Board Of Directors

Contact Us