संस्थापक
मा. आर. एस. पवार (मामासाहेब)

आज श्री सत्यविजय सहकारी बँक लि. कुंडल रौप्यमहोत्सवी वर्षात करीत आहे, याचा मला आनंद व अभिमान वाटतो. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एको शतकाच्या प्रारंभी सहकारी चळवळांचा जन्म झाला असला तरी स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळीला प्राप्त झाला. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्याच्या मंत्राने पछाडलेली आमची तरुण पिढी सज इस देशासाठी सर्वस्व अपर्ण करायला देश स्वतंत्र झाला पण अज्ञान, अंधश्रद्धा आणि गरीबी ही राहिली. राजकीय सत्तेत कोणाच्या तरी सोग्याला धरून राजकारणात प्रवेश करावा असे त्या मला वाटले नाही आणि आजही वाटत नाही. गरीबीने पछाडलेली माणसं आणि त्यांच्या डो करपून जात असलेली स्वप्नं मी जवळून पाहिली. मी स्वतः गरीबी हा काय शाप असतो याचा भोगला आहे. किर्लोस्कर फैक्टरीतला एक कामगार म्हणूनही मी काही काळ काम केले आहे. किल घराण्याचा माझ्यावर जो संस्कार झाला. त्यांचे जे प्रेम व आशीर्वाद लाभले त्याचा परिणाम मी आज कार्यरत आहे.

स्वातंत्र्याच्या काळानंतर सामाजिक कामाकडे मी व लागलो. ग्रामविकासापासून सहकारी करण्यापर्यंत एका पाऊलवाटेने माझा प्रवास सुरू झाला. गेली पंचवीस वर्षे या बँकेचा सं चेअरमन अशा दोन्ही भूमिका मला कराव्या लागल्या सभासदांचे सहकार्य, ज्ञात-अज्ञातः अशा लोकांचे प्रेम मला लाभले. या साज्याचे प्रतिक म्हणून आज हे वास्तववादी काम उभे आहे. ग्रामस्थांना एकत्रित आणून त्यांच्याच सहकार्याने अल्पशा भांडवलात एका सहकारी बँकेचा जन्म परस्पर सहकार्यातून आर्थिक प्रश्न सोडविणे, पतहीनाला पतवान बनविणे आणि स्वतंत्र पायावर, आपला मार्ग शोधणे या तंत्र-मंत्राचा प्रचार आणि प्रसार या बँकेच्या माध्यमाने सुरू केला.

 

प्रारंभीच्या काळी या क्षेत्रात माझे सहकारी म्हणून कै. डॉ. गोविंद वासुदेव जरंडीकर, तातौबा माने, के. शंकरराव केशवराव लाड, के, विष्णू रामचंद्र हडदरे, कै. वीर गुरुजी आि या संस्थेचे मानचिन्ह म्हणून लाभले याचाही सार्थ अभिमान वाटतो व विद्यमान संचालक शाहीर विद्यमान व्हाईस चेअरमन डॉ. शामसुन्दर जरंडीकर, विद्यमान संचालक श्री. प्रकाशर श्री. दिलीप नलवडे, श्री. विकास लाड, डॉ. डी. डी. माने व अन्य संचालक मंडळातील सभासद व कर्मचारी ही मान्यवर मंडळी मला समर्थ अशी लाभली, हे माझे मत. आज संस्था पंचवीस वर्षाच्या तारुण्यात लोटली. ही संस्था आम्हा सभासदांची तरुण माता आहे. या संस्थेचे संवर्धन, संगोपन आणि तिला मोठे करण्याचे काम आता येणाऱ्या पिढीकडे सोपविण्याचा मनोदय मी व्यक्त करीत आलो आहे.

या कक्षेत्रात निःस्वार्थी वतीने काम करण्याचा आनंद मी मनसोक्त लुटला आहे. दारिद्रयाच्या अबूचे रूपांतर आनंदरभूत पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. थेट बोलण्याची माझी पद्धत कित्येकांना दुखावून गेली असेल पण संस्था जिवंत ठेवायची असेल तर स्पष्ट, स्वच्छ आणि सत्य यांच्याच आधारावर बोलावे लागेल. तरच संस्था खन्या अर्थाने जिवंत राहील. भल्याबुऱ्या अनुभवाची शिदोरी घेऊन दोन तपे मी जी वाटचाल केली त्या वाटचालीत भविष्यकाळ लपला आहे. आज सर्वसामान्यांच्या बँक म्हणून श्री सत्यविजय सहकारी बैंक एका शाखेसह उभी आहे. बँकेच्या विविधांगी प्रगतीची कल्पना या स्मरणीकेच्या रूपाने प्रसिद्ध केली आहे.

पारंपारिक पद्धतीमध्ये समाजाची बदलती रचना लक्षात घेऊन बँकांनी आपले व्यवहार बदलले पाहिजेत देशाची, समाजाची आर्थिक गरज लक्षात घेऊन कर्जधोरण बदलावे लागणार आहे. यांत्रिकीकरणाची गरज आहे. तळागाळातला माणूस हा केंद्रबिंदू मानून बँकांनी काम केले पाहिजे अशी माझी धारण आहे.

शेवटी मी एक वारकरी संप्रदायातला एक सामान्य टाळकरी. ही सहकाराची दिंडी खांद्यावर घे पंचवीस वर्षे चालत राहिलो. आपली बँक हाच माझा विठ्ठल झाला; हीच माझी माऊली, हो सहकारम श्री सत्यविजयचे पंढरपूर आपण सर्वांनी मोठे करावे वाढवावे त्याचे पावित्र्य जपावे आणि सर्वसामान्यां जीवनातील एक नंदादीप बनावा एवढीच प्रार्थना.

 

॥ जय सहकार ॥