
"सत्यविजय" गौरवगीत
जनजीवन सहकार” घडविते करिता अंगिकार
“सत्यविजय” हा असे त्यांचा जंगी साक्षात्कार ||
बीज पेरिता एक दिलाने
जपता रोप ते सहभावाने
कल्पवृक्षचि होय तयाचा नाही चमत्कार
“सत्यविजय” हा असे तयाचा जंगी साक्षात्कार ||१||
सहकारात पाऊले गुंतली
कार्यक्षेत्र अन् श्रध्दा वाढली
काटेकोरपण, शिस्त ठेऊनी दिला नवा आकार “सत्यविजय” हा असे तयाचा जंगी साक्षात्कार || २ ||
कृषक आणि श्रमिक इथले घामाने रचिती मनोरथ आपुले
मार्ग भला बचतीचा, तयांनी केला असे स्वीकार “सत्यविजय” हा असे तयाचा जंगी साक्षात्कार ||३||
नाम समर्पक कामही सार्थक “रजत महोत्सव भूषण तीर्थक सतर्क आणि अथक परिश्रम घडवी दीपोत्कार “सत्यविजय” हा असे त्याचा जंगी साक्षात्कार ॥४॥
नि. स्वार्थी मन तळमळ पोटी फळे तयाची रसाळ गोमटी प्रगतीच्या या मार्गस्थांचा रहावा भव्य सत्कार “सत्यविजय” हा असे त्याचा जंगी साक्षात्कार ||५||
प्रा. मोहन निकम पाटील